Share Market and Mutual Fund : म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय रे भाऊ ? Share Market अन Mutual Fund मध्ये नेमका फरक काय ? वाचा सविस्तर

Share Market and Mutual Fund :  भारतात गुंतवणुकीसाठी नानाविध ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील. गुंतवणूकदार आपल्या सोयीप्रमाणे आणि गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. आपल्या देशात मात्र गुंतवणुकीसाठी सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे हे वेगळे सांगण्याचे काही कारण नाही.

कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये, नुकसान सहन करावे लागू नये यासाठी सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दिले जाते. सुरक्षित गुंतवणुकीमध्ये बँकेची एफ डी, सोन्या-चांदी मधील गुंतवणूक, पोस्ट ऑफिस एलआयसी यामधील बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी योजना यांसारख्या नानाविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते.

याव्यतिरिक्त गुंतवणुकीचा अलीकडे विशेष लोकप्रिय प्रकार म्हणजेच शेअर मार्केट. शेअर मार्केटमधील गुंतवणूक मात्र सुरक्षित नसते या ठिकाणी खूप रिस्क आहे. यामुळे शेअर मार्केटमध्ये केवळ आणि केवळ अर्थशास्त्रातील तज्ञ किंवा शेअर मार्केटची ज्याला चांगली समज आहे असेच लोक गुंतवणूक करतात.

तज्ञ देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी पूर्वी अभ्यास करावा असा सल्ला देतात.

अलीकडे मात्र म्युचूअल फंड देखील शेअर मार्केटचा एक भाग असून येथील गुंतवणूक देखील रिस्की आहे अशी धारणा तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र म्युच्युअल फंड हे शेअर बाजाराशी आधारित जरूर आहे परंतु ते शेअर मार्केट एवढे रिस्की नाही.

येथे देखील शाश्वत रिटनची हमी नसते मात्र नुकसान होण्याची शक्यता कमी असते. शेअर मार्केट सारखे म्युच्युअल फंड रिस्कि नसल्याचे जाणकार लोक सांगतात. दरम्यान आता आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय हे थोडक्यात पाहणार आहोत.

म्युच्युअल फंडचे फायदे || Advantages of Mutual Fund

यामध्ये शेअर मार्केटच्या तुलनेत रिस्क कमी आहे. येथे गुंतवणूक केल्यास बँकेच्या एफडी पेक्षा किंवा इतर बचत योजनांपेक्षा अधिकचे रिटर्न मिळते. सरासरी म्युच्युअल फंड मधून 12 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असा दावा तज्ञ करतात.

विशेष म्हणजे येथे गुंतवलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज लागू होते. यामुळे इथला पैसा हा लवकर मोठा होतो. एफडी किंवा इतर बचत योजनांच्या बाबतीत असं घडत नाही.

शिवाय एफडी आणि इतर बचत योजनांमध्ये दिले जाणारे व्याज हे खूपच कमी असते. यामुळे जर वाढत्या महागाईशी मुकाबला करायचा असेल तर अधिक परतावा जिथे मिळतो तिथे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते असे काही तज्ञ सांगतात.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यासाठी तुम्हाला कोणताच मोठा रिसर्च करावा लागत नाही, अभ्यास करावा लागत नाही.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला संबंधित कंपनी बाबत डिटेल माहिती जाणून घ्यावी लागते. येथे मात्र तसे होत नाही. तुम्ही ज्या फंडमध्ये गुंतवणूक करणार आहात तो फंड तुमचे पैसे कसे वाढतील याबाबत विचार करतो.

म्युच्युअल फंड मध्ये जॉब करणारा, बिझनेस करणारा, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, गृहिणी असे कोणीही गुंतवणूक करू शकतो. यासाठी फारसा नॉलेजची गरज राहत नाही.

ज्याला इंटरनेट वापरता येते तो सहजतेने येथे गुंतवणूक करू शकतो. जो इंटरनेट फ्रेंडली नाही तो देखील अगदी दोन मिनिटात म्युच्युअल फंड काय आहे हे समजू शकतो आणि यामध्ये गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंड मध्ये अनेकांचा पैसा एकत्रित केला जातो आणि फंड मॅनेजर हा पैसा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवतो. म्युच्युअल फंड मॅनेजर स्वतः कुठे पैसा गुंतवायचा हे डिसाईड करतो.

म्युचूअल फंड मॅनेजरला स्वतःचे नुकसान करायचे नसते यामुळे म्युच्युअल फंड मॅनेजर योग्य ठिकाणी पैसा गुंतवण्याचा प्रयत्न करतो आणि पैसा मोठा करण्याचा प्रयत्न करतो. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे म्युच्युअल फंड मधला पैसा हा एका ठिकाणी गुंतवला जात नाही.

वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसा गुंतवलेला असतो यामुळे सर्वच सेक्टर नकारात्मक परतावा देतील असे होऊच शकत नाही.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची || How to invest in Mutual Fund

Groww, ET Money, Paytm Money या अँप्लिकेशनच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता येणे शक्य आहे. याशिवाय स्टॉक ब्रोकर च्या माध्यमातून देखील येथे गुंतवणूक करता येणे शक्य आहे.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय || Options To Invest In Mutual Funds

म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला किंवा दररोज देखील गुंतवणूक करता येते किंवा एकरकमी गुंतवणूक देखील करता येते. जर म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला किंवा दररोज एक ठराविक रक्कम गुंतवायची असेल तर एस आय पी केली जाते.

एस आय पी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा नोकरदार वर्गासाठी विशेष फायदेशीर ठरतो. तसेच लम्सम गुंतवणुक ही ज्या लोकांकडे खूप मोठी रक्कम पडून आहे त्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. कारण की यावर एफडी पेक्षा अधिकचे व्याज मिळते.

म्युच्युअल फंडचे काही लोकप्रिय प्रकार || Some Popular Types of Mutual Fund

Equity mutual fund, Fixed income funds, Debt Fund, Hybrid mutual fund असे काही म्युच्युअल फंड चे लोकप्रिय प्रकार आहेत. यापैकी कोणत्याही एका प्रकारात गुंतवणूक केली जाऊ शकते.

कोणता फंड तुमच्यासाठी सूटेबल ठरू शकतो यासाठी तुम्ही तज्ञ लोकांचा एकदा सल्ला देखील घेऊ शकता.

Leave a Comment