Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचे संकट कायम; कोकणात आंबा, काजूला फटका

Maharashtra Weather Update : उत्तर भारतातील थंडीचा कडाका कायम असला तरी राज्यातील थंडीचा कडाका कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कायम आहे. मात्र दुसरीकडे दक्षिण भारतात पाऊस कोसळताना दिसत आहे.

त्यातच आता राज्यात येत्या ४८ तासांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही पिकांचे नुकसान झाले आहे.

संपूर्ण देशभरातील वातावरणात बदल झाल्यामुळे देशभरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील नागरिकांना थंडीच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळणार आहे.

मात्र मागील २४ तासांत उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम पाहायला मिळाला आहे.

राज्यात मागील २४ तासांत विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. तसंच आज आणि उद्या देखील राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोकणात मागील २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आंबा, काजू पिकांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक, अहमदनगर, नंदुरबार जळगाव भागातही हलका पाऊस झाला आहे.

दरम्यान, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मागील २४ तासात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कोकणात आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याच बरोबर कर्नाटक, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Leave a Comment