Post Office Saving Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना, पाच वर्षातच बनवेल लखपती || A great plan of post office, will make lakhpati in five years

Post Office Saving Scheme : लोक गुंतवणुकीसाठी असे पर्याय शोधतात जिथे जास्त व्याजासह पैसे देखील सुरक्षित राहतील. पोस्ट ऑफिस देखील तुमच्यासाठी अशाच योजना ऑफर करते. येथे अगदी सर्व वयोगटातील लोकासांठी योजना आहेत, ज्या त्यांच्या गरजा लक्षात घेऊन चालवल्या जात आहेत.

आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. जिते बक्कळ व्याज मिळत आहे. 

आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल बोलत आहोत, ही योजना खास वृद्धांसाठी तयार करण्यात आली आहे. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

ज्येष्ठांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. या कारणास्तव, पोस्ट या योजनेवर अधिक व्याज देखील देत आहे. पोस्ट ऑफिसची ही बचत योजना इतर योजनांपेक्षा जास्त व्याज ऑफर करते. हे व्याज ८.२ टक्क्यांपर्यंत आहेत.

30 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल || How much return will be earned on an investment of Rs 30 lakh

जर गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपये असेल आणि व्याज दर 8.2 टक्के असेल तर 5 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 12.30 लाख रुपये आणि व्याजासह एकूण 42.30 लाख रुपये मिळतील.

ज्येष्ठ नागरिक बचतीचे फायदे || Benefits of Senior Citizen Savings

तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत एकूण ५ वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर ८.२ टक्के व्याज दिले जात आहे. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्ही 1,000 ते 30 लाख रुपये गुंतवू शकता.

यामध्ये टॅक्स बेनिफिटही मिळतो. आयकराच्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर लाभ मिळतो. याची तुलना बँकांशी केल्यास, काही बँका ग्राहकांना ८.२ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे ६० वर्षांवरील लोक देखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत त्रैमासिक आधारावर व्याज उपलब्ध आहे. तर 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच पैसे पूर्ण मिळतात.

या योजनेत ग्राहक किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात. या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत आहे. याशिवाय यात कलम 80C अंतर्गत कर सूट देखील मिळते.

Leave a Comment