Bank FD Interest Rate : गुंतवणूकदार होणार मालामाल ! देशातील ही स्मॉल फायनान्स बँक एफडी साठी देतेय 9.6% व्याजदर || Investors will be rich! This small finance bank of the country offers 9.6% interest rate for FD

Bank FD Interest Rate : जर तुम्हीही एफडी करण्याचा विचारात असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी घेऊन आलो आहोत. खरे तर भारतात गुंतवणुकीला खूप महत्त्व आहे. देशात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये बँकेची एफडी योजना देखील एक लोकप्रिय प्रकार आहे.

एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अलीकडे बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज पुरवले जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. देशातील काही स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीसाठी तब्बल 9.6% पर्यंतचे व्याज देत आहेत.

अशा परिस्थितीत आज आपण देशातील अशा टॉप 5 बँकांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक || Suryodaya Small Finance Bank

ही देशातील एक लोकप्रिय स्मॉल फायनान्स बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना एफडी साठी चांगले व्याज पुरवत आहे. बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एफडी साठी तब्बल 9.6% व्याज ऑफर केले जात आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक || Unity Small Finance Bank

ही स्मॉल फायनान्स बँक एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांनी एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास 9.5% व्याज ऑफर करत आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक || Jan Small Finance Bank

ही बँक देखील एफडी करणाऱ्यांना चांगला रिटर्न देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एफडीसाठी नऊ टक्के व्याज ऑफर केले जात आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या बँकेत एफडी करणे देखील चांगले फायदेशीर ठरणार आहे.

ESAF स्मॉल फायनान्स बँक || ESAF Small Finance Bank

या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडी वर चांगले व्याज दिले जात आहे. या बँकेत जर ज्येष्ठ नागरिकांनी एफडी केली तर त्यांना नऊ टक्के एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक || Ujjivan Small Finance Bank

या बँकेकडूनही ज्येष्ठ नागरिकांना एफडी साठी चांगले व्याज उपलब्ध करून दिले जात आहे. इतर पब्लिक सेक्टर मधील आणि खाजगी क्षेत्रातील बँकेच्या तुलनेत ही बँक चांगले व्याज वापर करत आहे. या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडी साठी 8.75 टक्के व्याज ऑफर केले जात आहे.

Leave a Comment