SBI Home Loan :  एसबीआयमधून 25 लाखाचे होमलोन घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ?

SBI Home Loan Calculation : आपल्यापैकी अनेकांनी नवीन घराच्या निर्मितीचे स्वप्न पाहिलेले असेल. काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक आजही या स्वप्नासाठी झगडत असतील.

मात्र, घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करणे अवघड होत आहे. यामुळे अनेकजण आता घराच्या स्वप्न पूर्ततेसाठी होम लोनचा अर्थातच गृहकर्जाचा पर्याय स्वीकारत आहेत.

विशेष म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक जाणकार लोक सर्वसामान्यांना गृह कर्ज घेऊन घर उभारणीचा सल्ला देतांना पाहायला मिळत आहेत.

घरातील गुंतवणूक ही आयुष्यातील एक मोठी उपलब्धी असते. शिवाय दिवसेंदिवस कमी होत चाललेली जागा आणि वाढणारी लोकसंख्या पाहता आगामी काळात घरांच्या किमती आणखी वाढणार आहेत.

यामुळे गृहकर्ज घेऊन घराची उभारणी करणे वाईट नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे अलीकडे गृह कर्ज घेऊन घर उभारणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

अनेक बँका कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. एसबीआय बँक देखील सर्वसामान्यांना स्वस्तात गृह कर्ज पुरवण्याचा दावा करते.

दरम्यान आज आपण एसबीआय बँकेकडून जर 25 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला किती रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

यामुळे आपल्याला एसबीआय गृह कर्जासाठी किती व्याजदर आकारते हे देखील समजू शकणार आहे. एसबीआय बँकेच्या माध्यमातून किमान 8.6 टक्के व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

जर समजा तुम्हाला याच सुरुवातीच्या व्याजदरात 25 लाखाचे होम लोन 20 वर्षांच्या टेन्युअरसाठी मिळाले तर आपणास 21 हजार 854 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. या कालावधीत 27 लाख 44 हजार रुपयांचे व्याज सदर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला भरावे लागणार आहे.

म्हणजे या वीस वर्षांच्या कालावधीत 25 लाखांची मूळ रक्कम आणि 27 लाख 44 हजार रुपयांचे व्याज असे एकूण 52 लाख 44 हजार रुपये भरावे लागणार आहेत. मात्र व्याजदरात बदल झाल्यानंतर मासिक हप्त्यात देखील बदल होणार आहे.

Leave a Comment