Cibil Score Increase Tips: सिबिल स्कोर घसरल्यामुळे कर्ज मिळणे कठीण झाले आहे का? वापरा ‘या’ टिप्स आणि वाढवा तुमचा सिबिल

Cibil Score Increase Tips :- एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायची वेळ आली तर तुमचा सिबिल स्कोर कसा आहे हे अगोदर पाहिले जाते. म्हणजे जर समजा एखाद्या वेळेस काही कारणांमुळे तुमचा सिबिल स्कोर घसरलेला असेल तर तुम्हाला बँकेकडून किंवा इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळणे मुश्किल होते किंवा कर्ज मिळतच नाही.

जरी मिळाले तरी ते जास्त व्याजदरात दिले जाते. त्यामुळे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवणे खूप गरजेचे आहे. परंतु जर तुमचा सिबिल स्कोर घसरलेला असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी पाळणे खूप गरजेचे आहे.

साधारणपणे साडेपाचशे ते साडेसातशेच्या मध्ये सिबिल स्कोर असेल तर तो चांगला मानला जातो या सिबिल स्कोर मध्ये तुम्हाला सहजरित्या कर्ज मिळू शकते.

त्यापेक्षा जर साडेसातशे ते नऊशे च्या दरम्यान तुमचा सिबिल असेल तर तुम्हाला मात्र परवडणाऱ्या आणि आकर्षक व्याजदरामध्ये सहजरीत्या बॅंका कर्ज देतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा सिबिल उत्तम ठेवणे खूप गरजेचे आहे.

याकरिता तुमचा जर सिबिल घसरला असेल तर काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर वाढवू शकतात.

 

या टिप्स फॉलो करून वाढवा तुमचा सिबिल || Increase your Sibil by following these tips

कर्जाचे हप्ते वेळेवर भरा  || Pay loan installments on time

समजा तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे तर त्याची परतफेड तुम्ही वेळेवर करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर परतफेड करत नसाल तर मात्र याचा विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होण्याची शक्यता असते.

यामुळे तुम्ही घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर परत करणे हे तुमच्या क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरा.

 कर्जाच्या हप्ते भरायला वेळ करू नये || Do not take time to pay the loan installments

तुम्ही हप्त्यावर एखादे घर किंवा गाडी खरेदी केलेली आहे तर तुमचे जे कर्जाचे हप्ते आहेत ते वेळेत भरणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही वेळेवर कर्जाचे हप्ते भरले नाहीत तर त्याचा खूप वाईट परिणाम तुमच्या सिबिल स्कोर होतो.

जर तुम्ही त्या तारखेलाच ईएमआय भरला तर तुमचा सिबिल स्कोर वाढायला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते.

 वारंवार सिबिल स्कोर तपासावा आणि काही चुका असतील तर दुरुस्त कराव्यात || CIBIL score should be checked frequently and any mistakes should be corrected

तुम्ही तुमचा सिबील रिपोर्ट चेक करणे खूप गरजेचे आहे. जर यामध्ये काही चुका किंवा काही दोष तुम्हाला दिसून आले तर त्या पटकन सुधारणे खूप महत्त्वाचे आहे. करण्यामध्ये आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड आपण वेळेत पूर्ण केलेले असते.

परंतु कर्ज खाते बंद करायला आपण विसरतो. त्यामुळे देखील तुमचा सिबिल स्कोर घसरू शकतो. याकरिता तुमचे कर्ज परतफेड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घेतलेले कर्ज खाते लवकर बंद करणे गरजेचे आहे.

एखाद्याच्या कर्जाला जामीनदार किंवा गॅरेंटर होऊ नये || One should not become a surety or guarantor for one’s debt

बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी जामीनदार किंवा गॅरेंटर असतो. परंतु संबंधित व्यक्तीने वेळेवर कर्ज परतफेड केले नाही तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर देखील होतो.

समजा एखाद्या सोबत तुमचे संयुक्त खाते आहे आणि तुमच्या सोबतच्या व्यक्तीने जर कर्ज भरले नाही किंवा तो डिफॉल्टर झाला तरी तुमचा क्रेडिट स्कोर झपाट्याने कमी होतो. याकरिता एखाद्याला कर्जाकरिता जामीनदार किंवा गॅरेंटर होण्याचे टाळणे हे तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.

क्रेडिट कार्ड वरच्या लिमिटच्या 30 टक्केच खर्च करावा || Spend 30 percent of credit card upper limit

समजा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत आहात व त्या कार्डवर तुम्हाला जो काही लिमिट देण्यात आलेला आहे त्या लिमिटच्या फक्त 30 टक्केच वापर करणे तुमच्याकरिता फायद्याचे ठरू शकते. परंतु जर तुम्ही 30% पेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिलवर विपरीत होतो.

तसेच क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची जी काही सायकल असते ती पूर्ण होणे आधीच क्रेडिट कार्डचे बिल भरणे गरजेचे आहे. वेळेत क्रेडिट कार्डचे बिल भरले तरी तुमचा सिबिल स्कोर खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होते.

Leave a Comment