इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! टाटा लाँच करणार 3 नवीन Electric Car || Good news for electric car buyers! Tata to launch 3 new Electric Car

Tata Upcoming Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढलेला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांना केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन मिळत आहे. हेच कारण आहे की बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना लाँच केले आहे.

दरम्यान या नवीन वर्षात इलेक्ट्रिक कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये धबधबा असलेली भारतीय कार मेकर कंपनी टाटा पुन्हा एकदा मोठा धमाका करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा लवकरच तीन नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

सध्या भारतीय बाजारात Tata चा इलेक्ट्रिक कारमध्ये दबदबा आहे. अशातच आता ही भारतातील लोकप्रिय वाहन निर्माती कंपनी टाटा पंच इलेक्ट्रिक, टाटा कर्व इलेक्ट्रिक आणि टाटा हैरियर इलेक्ट्रिक या तीन नवीन गाड्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामुळे जर तुम्हाला टाटाची इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर आत्तापासूनच पैशांची जमवाजमा करावी लागणार आहेत. खरेतर टाटा मोटर्स भारतीय कार मार्केटमध्ये सर्वात लोकप्रिय ऑटो कंपनी आहे.

या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनले आहेत. कंपनीचे असे एखादेच मॉडेल असेल जे ग्राहकांना आवडत नाही. या कंपनीच्या जवळपास सर्वच गाड्या ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय बनलेल्या आहेत. कंपनीने सर्वच सेगमेंट मध्ये आपला झेंडा गाडला आहे.

अशातच आता कंपनी नवीन तीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. आज आपण याच नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीच्या विशेषता अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

टाटा पंच इलेक्ट्रिक || Tata Punch Electric

 मिळालेल्या माहितीनुसार टाटा उद्या अर्थातच 17 जानेवारीला टाटा पंच इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. यामुळे जर तुम्हाला टाटाची इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर हा देखील ऑप्शन उद्यापासून तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान टाटा पंच ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात Citroen eC3 शी स्पर्धा करणार असल्याचे बोलले जात आहे. ही नव्याने लॉन्च होणारी गाडी टाटाची Acti.ev प्लॅटफॉर्मवर आधारित पहिली इलेक्ट्रिक कार राहणार असा दावा कंपनीने केला आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, आगामी पंच 25kWh आणि 35kWh च्या दोन बॅटरी पॅकसह येऊ शकते.

ही गाडी पूर्ण चार्ज केल्यावर 400 किमीची रेंज देण्यास सक्षम राहणार आहे. पंच EV चे बुकिंग 5 जानेवारीपासून सुरू झालेले आहे. फक्त आणि फक्त 21,000 रुपयांच्या टोकन अमाऊंट मध्ये ही गाडी बुक करता येणार आहे.

टाटा पंच स्मार्ट, अॅडव्हेंचर, एम्पॉवर्ड आणि एम्पॉवर्ड + या 4 प्रकारांमध्ये बाजारात लॉन्च होणार आहे. म्हणजे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार वॅरीयंट खरेदी करता येणार आहे.

टाटा कर्व इलेक्ट्रिक || Tata Curve Electric

देशातील लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी टाटा उद्या टाटा पंच इलेक्ट्रिक लॉन्च करणार आहे. यासोबतच आगामी काही दिवसात कंपनीच्या माध्यमातून टाटा कर्व इलेक्ट्रिक ही नवीन कार देखील बाजारात उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कंपनी मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये बहुप्रतिक्षित Tata Curve EV लाँच करणार असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागले आहे. कूप डिझाइन श्रेणीतील टाटाची ही पहिली कार राहणार अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे टाटाची ही गाडी अधिक रेंज देणार आहे.

ही गाडी एकदा फुल चार्ज केल्यानंतर तब्बल पाचशे किलोमीटर पर्यंत धावणार अशी माहिती समोर येत आहे. म्हणजे या गाडीचा खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना देखील मोठा फायदा मिळणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर लांब पल्ल्याचे शहर यामुळे गाठता येणार आहे.

टाटा हॅरियर ईव्ही || Tata Harrier EV

टाटा पंच इलेक्ट्रिक आणि टाटा कर्व इलेक्ट्रिक सोबतच टाटा मोटर्स लवकरच बाजारात आपली बहुप्रतिक्षित Tata Harrier EV सुद्धा लाँच करणार असे बोलले जात आहे. या कारमध्ये ग्राहकांना ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) सह ड्युअल मोटर सेटअप मिळणार आहे.

विशेष म्हणजे मी गाडी नाही केलं सक्षम राहणार आहे. ही गाडी एकदा चार्ज केली की पाचशे किलोमीटर पर्यंत धावणार आहे. या गाडीमध्ये मोठा 12.3-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आणि प्रगत ADAS तंत्रज्ञान देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. निश्चितच भन्नाट फीचर्स वाले ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरणार आहे.

Leave a Comment