गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी जीव धोक्यात घातला, थेट विजेच्या डीपीवर…

Gautami Patil :- गौतमी पाटील ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. विशेष: युवकांमध्ये गौतमी पाटील हिच्याबद्दल मोठे क्रेझ बघायला मिळते. गौतमी पाटील हिचा कोणत्याही कार्यक्रम असो तिथे तुडूंब अशी गर्दी बघायला मिळते.

हेच नाही तर गौतमी पाटील हिची एक झलक बघण्यासाठी युवक गर्दी करतात. बऱ्याच वेळा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. तूफान अशी गर्दी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात कायमच बघायला मिळते.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमामधील व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दिवसेंदिवस गौतमी पाटील हिची क्रेझ प्रचंड अशी वाढतानाच दिसत आहे.

बऱ्याच वेळा गौतमी पाटील हिचा डान्स बघण्यासाठी युवक हे आपला जीव धोक्यात घालताना देखील दिसतात. हेच नाही तर गौतमी पाटील हिने लावणी सुरू करतानाच युवक गाण्यावर ठेका धरण्यापासून स्वत: ला रोखू देखील शकत नाहीत. गौतमी पाटील हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

नुकताच गौतमी पाटील ही लातूर शहरात एका बिर्याणी हॉटेलच्या ओपनिंगसाठी पोहचली. यावेळी गौतमी पाटील हिची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. पाय ठेवायला देखील अजिबातच जागा नव्हती.

विशेष म्हणजे याच ठिकाणी गौतमी पाटील हिचा धमाकेदार नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. मग काय युवकांची तूफान गर्दी.

गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी काही युवक हे थेट विद्युत डीपीवरच चढून बसले. धक्कादायक बाब म्हणजे या टीपीमध्ये विद्युत प्रवाह सुरूच होता. गौतमी पाटील हिला पाहण्याच्या नादात युवकांना हे भानच राहिले नाही की, ते थेट डीपीवर चढून बसेल. या युवकांचे नशीब बलवत्तर की, कोणताही चुकीचा प्रकार घडला नाही.

हैराण करणारे म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता हे युवक डीपीवर चढून गौतमी पाटीलचा डान्स बघण्यात आणि मोबाईलमध्ये शूट करण्यात मग्न झाले होते. शेवटी हा प्रकार गौतमी पाटील हिच्याच लक्षात आला आणि तिने त्या युवकांना खाली उतरण्याची विनंती केली. यावेळी काही वेळ कार्यक्रम थांबण्याची वेळ आली.

Leave a Comment