बीडमध्ये शाळेच्या कॅम्पसमध्येच पुरुष शिक्षकाचे तीन महिला शिक्षकांसोबत शारीरिक संबंध; Porn Site वर पोस्ट केले व्हिडिओ; गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील बीड (Beed) जिल्ह्यातील मिलिया माध्यमिक विद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाचा एमएमएस (MMS) घोटाळा समोर आला आहे. आमेर काझी असे आरोपीचे नाव असून तो वेगवेगळ्या एमएमएसमध्ये तीन महिलांसोबत दिसत आहे. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओमधील महिला शाळेत शिकवणाऱ्या महिला शिक्षिका आहेत.

हे एमएमएस पॉर्न साइटवरही अपलोड करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमेर काझीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमेर काझी फरार आहे. शाळा प्रशासनाने 3 महिला शिक्षकांनाही निलंबित केले आहे. आमेर काझीच्या पत्नीने पुढे येऊन पतीवर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण बीड जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे मिलिया शाळा अंजुमन इशत-ए-तालीम नावाच्या संस्थेअंतर्गत चालवली जाते. शाळेत 23 महिला आणि सुमारे 46 पुरुष शिक्षक कार्यरत आहेत.

आमेर काझी हा 2012 पासून या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आमेर काझीचे 16 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तिचा 2012 पासूनच आपल्या पतीच्या हालचालींवर आणि चारित्र्यावर संशय होता.

आमेर काझीच्या पत्नीचा आरोप आहे की, एके दिवशी तिच्या पतीने तिच्यासमोर अनेक मुलींसोबतचे अवैध संबंध असल्याची कबुली दिली. तसेच पत्नीला सर्व काही जाणून घेतल्यानंतर जुळवून घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आमेरची पत्नी आपल्या पतीच्या गैरकृत्याची तक्रार शाळा व्यवस्थापनाच्या महिला अधिकारी सबीहा यांच्याकडे गेल्या एक वर्षापासून करत होती.

परंतु सबिहाने आमेरच्या पत्नीकडे पुरावे मागायला सुरुवात केली. या दरम्यान, आमेरच्या लॅपटॉपमधून त्याच्या पत्नीने आपल्या पेनड्राईव्हमध्ये अनेक महिलांसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आणि व्हिडिओ घेतले.

या फोटो आणि व्हिडिओमध्ये आमेर शाळेतील तीन महिला शिक्षकांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होता. मात्र सबिहाला सर्व पुरावे देऊनही तिने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप आमेरच्या पत्नीने केला आहे. यासह आमेरच्या पत्नीने शाळेवर चुकीच्या उपक्रम चालवल्याचा आणि चुकीच्या कामांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. आमेरच्या पत्नीला असाही संशय आहे की, तिचा पती मुलींना शाळेतच नाही तर घरातही आणायचा.

पतीच्या कृत्याचा निषेध केल्यावर तिला धमकावण्यात आले. एका रिपोर्टनुसार, जे व्हिडिओ समोर आले आहेत ते परस्पर संमतीने बनवलेले दिसत आहेत. आमेरने शाळेतील तीन महिला शिक्षकांसोबत अश्लील वर्तन तर केलेच शिवाय त्यांच्याशी शारीरिक संबंधही ठेवले.

काही वेळाने हे सर्व व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आले. येथून हे व्हिडिओ व्हायरल झाले जे शाळेच्या मुख्याध्यापकांच्याही समोर आले. 

याप्रकरणी मुख्याध्यापकांनी आमेर काझी याच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आयटी कायद्याच्या कलमांसह आयपीसीच्या कलम 292 (2), 294, 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमेर काझी त्याचे अश्लील व्हिडिओ पॉर्न साइटवर विकायचा असा संशय आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमेर काझी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आमेर काझीचे आणखी किती महिलांशी संबंध आहेत याचाही पोलीस तपास करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तीन महिला शिक्षकांनाही शाळा प्रशासनाने निलंबित केले आहे.

Leave a Comment